वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...

अकोल्यात आज वाहतुक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना अनोख्या प्रकारे शिक्षा दिली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांचा पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...
वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...जयेश गावंडे
Published On

अकोला: तुम्ही कितीही दंडाची शिक्षा द्या मात्र 'हम नहीं सुधरेंगे' अस म्हणत अनेक जण वाहतूक नियमांची पायमल्ली (Traffic Rules Breaking) राजरोसपणे करतात. मात्र अकोल्यात (Akola) आज वाहतुक पोलिसांनी (Aloka Traffic Police) नियम मोडणाऱ्यांना अनोख्या प्रकारे शिक्षा दिली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांचा पोलिसांनी पुष्पगुच्छ (Rose) देऊन सत्कार केला आहे. ('Gandhigiri' of traffic police, felicitating those who break the rules by giving a bouquet)

हे देखील पहा -

अकोला शहरात ट्रीपल सीट बसवुन वाहन चालवणारे वाहन चालक, वाहन चालवतांना मोबाईचा वापर करणारे चालक, दारू पिऊन वाहन चालवणारे वाहन चालक, फ्रन्ट सीट बसवुन चालवणारे ऑटो चालक तसेच रहदारीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी, तसेच आटो चालक असे एकुण 260 वाहन चालकांना बस स्टॅन्ड चौक ते टॉवर चौक या मार्गावर पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला व त्यांना रहदारीचे नियम पाळणेबाबत सुचित करण्यात आले. तसेच यापुढे रहदारीचे नियम मोडणाऱ्यांवर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला कडुन नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल या बाबत सांगण्यात आले.

वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...
वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...जयेश गावंडे

अकोल्यातील जेल चौक ते अग्रसेन चौक येथे पुलाचे नवनिर्माण करण्याचे काम सुरू आहे. तसेच शहरातील अनेक मुख्य रस्त्यांचे काम सुरू आहे. ज्यामुळे काही दिवसांकरीता शहरातील सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे शहरातील वाहतुक विस्कळीत होत आहे, तरी शहरातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळुन सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास शहरात होणाऱ्या अपघातास आळा घालण्यास मदत होते.

वाहतूक पोलिसांची 'गांधीगिरी', नियम मोडणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार...
एनसीबीच्या कारवाईला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न?

याकरीता अकोला शहरात रहदारीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी, तसेच आटो चालक यांचा गुलाबाचे फुले देवुन त्यांना रहदारीचे नियम पाळण्याचे आव्हाहन यावेळी करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी केलीय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com