Gadchiroli News: मुसळधार पावसाने रस्ता गेला वाहून; गरोदर महिलेनं जेसीबीच्या बकेटमधून ओलांडला रस्ता, गडचिरोलीचं भीषण वास्तव VIDEO

Pregnant Woman Crossed Road From JCB Bucket Video: गडचिरोलीमध्ये गरोदर महिलेनं जेसीबीच्या बकेटमधून रस्ता ओलांडल्याचं समोर आलंय. मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला होता.
गडचिरोली
Gadchiroli NewsSaam Tv
Published On

मंगेश बांदेकर, साम टीव्ही गडचिरोली

गडचिरोलीमध्ये जेसीबीच्या बकेटमध्ये बसून एका गरोदर मातेनं रस्ता ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर महिलेला रस्ता पार करण्याची नामुष्की आल्याची माहिती मिळत आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील आहे.

मुसळधार पावसाने रस्ता गेला वाहून

गडचिरोली जिल्ह्मातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख (Gadchiroli News) आहे. आलापल्ली ते भामरागड या १३०-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलंय. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेलाय.

गरोदर महिलेनं जेसीबीच्या बकेटमधून ओलांडला रस्ता

त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद झालीय. याचा फटका या गरोदर मातेला बसला आहे. भामरागड तालुक्यातील (Woman Crossed Road From JCB Bucket) कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे या महिलेसह तिचे नातेवाईक तातडीने रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, रस्ता वाहून गेला असल्याने ती अडकून पडली होती. रस्ता ओलांडणं तिच्यासमोरील मोठं आव्हान बनलं होतं.

गडचिरोली
Gadchiroli Food Poisoning: बारशाचं जेवण महागात पडलं! ५ चिमुकल्यांसह २८ जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

गडचिरोलीचं भीषण वास्तव

अशा परिस्थितीमध्ये रस्ता कामावर उभं असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून रस्ता पार करून देण्यात आला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट (Gadchiroli Rain) बनते, याची प्रचिती येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भीषण वास्तव या घटनेमुळे समोर आलंय. जीवावर खेळत या गरोदर महिलेनं रस्ता ओलांडल्याचं समोर आलंय. यामुळे संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गडचिरोली
Gadchiroli Rain Video: मुसळधार पावसाने वसतिगृहात शिरलं पाणी; 80 विद्यार्थ्यांना पोलिसांनी काढलं बाहेर!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com