Gadchiroli Crime: गडचिरोलीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, गावकऱ्यांना वेगळाच संशय; नेमकं काय घडलं?

Gadchiroli News Update: गडचिरोलीच्या आल्लापल्ली गावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 Gadchiroli Crime
Gadchiroli CrimeSaamtv
Published On

मंगेश भांडेकर, प्रतिनिधी

Gandchiroli Crime News:

गडचिरोली जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीच्या आल्लापल्ली गावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत अधिक तपास सध्या सुरू आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आलापल्ली येथील साई मंदिर परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे राकेश कन्नाके (वय 35, वर्ष) असे या तरुणाचे नाव असून तो आलापल्ली येथेच राहणारा आहे.

सदर युवकाचा मृतदेह चिखलाने माखलेला असून युवकाला कुठेतरी चिखलात तुडवून मारून त्याला साई मंदिर परिसरात फेकण्यात आल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. या घटनेमुळे आलापल्ली परिसरात खळबळ उडाली आहे. अहेरी पोलीस या घटनेचा घटनेचा तपास करत आहेत..

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Gadchiroli Crime
Maratha Aarakshan Protest: बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; एसटी बसच्या काचा फोडत केली दगडफेक

डोक्यात टपली मारल्याने तरुणाची हत्या..

मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरात क्षुल्लक कारणावरुन तरुणाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. डोक्यात टपली मारल्याच्या रागातून तरुणाने बियरच्या धारदार बाटलीने आपल्याच मित्राच्या डोक्यावर, गळ्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर जखमा केल्या.

नागेश बाबा दुधकवरे (35 वर्षे) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला महापालिकेच्या कूपर रुग्णालयात (Koopar Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Latest Marathi News)

 Gadchiroli Crime
Kaali Peeli Taxi: ६ दशकांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक; मुंबईच्या रस्त्यांवरुन काळी - पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' होणार गायब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com