गडचिरोतील जंगलक्षेत्रातील नागरिक शिकारी करत उदरनिर्वाह करतात. शिकारीसाठी त्यांच्याकडे बंदुका असतात. नागरिकांकडे बंदुका असल्याचं फायदा घेत माओवादी त्यांना आपल्या चळवळीत समाविष्ट करतात. यामुळे नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने पोलिसांच्या स्वाधीन करावेत,असे आवाहन पोलिासांनी केले होते. (Latest News)
पोलिसांच्या या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आपल्याकडील भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन केल्या. २ ते ८ डिसेंबर दरम्यान माओवाद्यांकडून राबविल्या जाणाया पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागांतर्गत नागरिकांनी स्वत:जवळ असलेल्या भरमार बंदूका पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र आहे. येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करत असतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात. अशा प्रकारच्या वडिलोपार्जित बंदुका आणि शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे होत्या. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेवून, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात.
याकरिता पोलीस अधीक्षकांनी नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने गडचिरोली पोलीस दलाकडे स्वाधीन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग कुरखेडा हद्दीतील ०८, भामरागड हद्दीतील ०३, पेंढरी हद्दीतील ०२, सिरोंचा हद्दीतील ०५ , जिमलगट्टा हद्दीतील ०२, अहेरी हद्दीतील 04, एटापल्ली हद्दीतील ०७ आणि धानोरा हद्दीतील १५ अशा एकूण ४६ भरमार बंदुका स्वाधिन केल्या. मागील वर्षी एकूण ७३ भरमार बंदुका जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.