Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; एके-४७, इन्सास रायफल जप्त

Gadchiroli Naxal News: पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू सह अन्य दोन महिला नक्षलवाद्यांना या चकमकीत कंठस्नान घालण्यात आले. या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांकडून एके -४७, कारबाईन, तसेच इन्सास राफाईल जप्त करण्यात आली आहे.
Gadchiroli Naxal News:
Gadchiroli Naxal News: Saamtv

सचिन गाड, गडचिरोली, ता. १३ मे २०२४

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासूसह अन्य दोघांचा या चकमकीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणार नक्षलवादी हालचाली वाढल्याचे दिसत आहे. आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच गडचिरोलीमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नक्षलवादी कत्रांगट्टा गावाजवळ जंगलात तळ ठोकून काही तरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक यातिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली c-६० दोन पथकं रवाना करण्यात आली. परिसरात शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला.

Gadchiroli Naxal News:
Sonia Gandhi: 'महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..', सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?

या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू सह अन्य दोन महिला नक्षलवाद्यांना या चकमकीत कंठस्नान घालण्यात आले. या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांकडून एके -४७, कारबाईन, तसेच इन्सास राफाईल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांची शोधमोहिम सुरू आहे.

Gadchiroli Naxal News:
Pune Loksabha News : '...अन्यथा शिक्षा व्हायला हवी'; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com