नागपूर: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ याच्या अडचणींत आणखीन वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन आणि हिंसक कृत्य करून घेण्याचा आरोप ठेवत हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्याला नोटीस बजावत 22 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Further increase in the difficulties of Hindustani Bhau; Nagpur police issued notice)
हे देखील पहा -
दहावी-बारावीच्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मॅसेज पाठवून विकास पाठक याने मुंबई आणि नागपुरातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून बेकायदेशीररीत्या आंदोलन करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणी दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन केले होते. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामुळे कायदा-सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर आता नागपुर पोलिसांनीही नोटीस बजावल्याने त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे.
Edited By - Akshasy Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.