कैलास चौधरी
उस्मानाबाद : ऑनलाइन गुन्हेगारीचे (Cyber crime) प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. गेल्या सात महिन्यात तब्बल 80 लाख रुपयांना फसवण्यात आले आहेत. यात अजुन एका गुन्ह्याची भर पडली आहे. क्रेडीट कार्डचे (Credit Card) बिल कमी करून देण्याचे अमिष दाखवून बावी गावातील दत्तात्रय मनसुके यांना 1 लाख 82 हजार 268 रुपयांना गंडा घातला.
हे देखील पहा-
उस्मानाबाद (Usmanabad) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनसुके यांच्या मोबाइलवर 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान एका अनोळखी क्रमांकावरुन वेळोवेळी कॉल आले. तुमच्या क्रेडीट कार्डचे बिल कमी करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. खोटे सांगून मनसुके यांच्याकडून क्रेडीट कार्डची माहिती व क्रमांक विचारुन घेतला. त्यानंतर रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी मनसुके यांच्या मोबाइलवर आलेला गोपनीय ओटीपीही विचारून घेतला. या माहितीच्या सहाय्याने त्या समोरील अनोळखी व्यक्तीने मनसुके यांच्या क्रेडीट कार्डवरुन रक्कम अन्यत्र स्थलांतरित केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनसुके फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.