अमानुष! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा
अमानुष! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षासंजय डाफ

अमानुष! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

शिकवणी साठी वर्गात उशिरा का आली ? या कारणाने वय वर्षे नऊ असलेल्या एका चिमुकलीला १०-१५ नाही तर तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा संतापजनक प्रकार भिवापूर तालुक्यातील महालगाव येथे उघडकीस आला आहे.
Published on

संजय डाफ

नागपूर : शिकवणी Class साठी वर्गात उशिरा का आली ? या कारणाने वय वर्षे नऊ असलेल्या एका चिमुकलीला १०-१५ नाही तर तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा संतापजनक प्रकार भिवापूर Bhivapur तालुक्यातील महालगाव येथे उघडकीस आला आहे. या शिक्षेमुळे मुलीची प्रकृती बिघडली आहे. सदर घटना ६ जुलैला घडली आहे. तर संबंधित शिक्षिकेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे देखील पहा-

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी गाथा कपिल ही इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ग चौथीची जबाबदारी आंचल कोकाटे या शिक्षिकेकडे आहे. गाथा शिकवणी वर्गात उशिरा पोहोचली. तर कोकाटे हिने तिला या गोष्टीसाठी तब्बल २०० उठाबशा मारण्याची शिक्षा ठोठावली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमानुष! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा
सणासाठी भावाकडे गेलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत बेला येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांना विचारणा केली त्यावेळेस सांगण्यात आले, त्यांनी आचल कोकाटे (वय २१, रा. महालगाव), राजेश चौधरी (वय ४०, रा. नागपूर), पांडुरंग बुचे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. चौकशी झाल्यावर दोषींवर कारवाई होईल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com