Nashik : पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू; कुटुंबिय हादरलं

या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Drown, nashik, chandwad
Drown, nashik, chandwadsaam tv
Published On

- अजय साेनवणे

Nasik : नाशिक (nasik) जिल्ह्यात एका चार वर्षाच्या मुलाचा (boy) पाण्याच्या टाकीत (water tank) बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना (family) माेठा धक्का बसला आहे. पाेलिस (police) या घटनेचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Drown, nashik, chandwad
Nashik : कांद्याचा भाव गडगडला, शेतकरी हवालदिल; हाेळीला अग्निडाग समारंभ, निमंत्रण पत्रिका व्हायरल

नाशिकच्या चांदवड (chandwad) शहरातील जून्या पोलिस स्टेशन जवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी बिल्डरने पाण्याची टाकी बनवली आहे. मात्र त्यावर झाकण लावण्यात आलेले नव्हते.

Drown, nashik, chandwad
Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण; Somvati Amavasya निमित्त लाखाे भाविक दाखल

या ठिकाणी खेळता खेळता हार्दिक पारवे हा चार वर्षीय चिमुरडा टाकीत पडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चांदवड पोलिस अधिक तपास करीत आहे.

दरम्यान खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने उस्मानाबाद येथे एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दुसरी दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे लहान मुलांना एकटे खेळण्यास पाठविताना ती काेठे जात आहेत याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com