
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर कारची चर्चा झाली. सध्या ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पण या प्रकरणामुळे फॉर्च्युनर कार वापरणाऱ्या कार मालकांकडे संशयाने पाहिले जात आहे. काही लोक चेष्ठेने तर काही संशयाने फॉर्च्युनर कार हुंड्यात मिळालेली आहे का?, असे फॉर्च्युनर कारमालकांना म्हणत आहेत. या चर्चांना कंटाळून करमाळ्याच्या अतुल खुपसे यांनी फॉर्च्युनर कारवर 'रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी' असा मजकूर लिहिला.
अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनर कारवर लिहिलेल्या मजकूराची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी ! फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा. हगवणे कट्टामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा! भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणेमुळे फॉच्यूनर जातीला धु धु धुतलयं..!' असा मजकूर फॉर्च्युनर कारच्या मागच्या काचेवर लिहिल्याचे पाहायला मिळते.
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह असतानाही वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना ५१ तोळे सोनं, महागडी फॉर्च्युनर कार, ७ किलो वजनाची चांदीची भांडी अशा अनेक गोष्टी हुंड्यामध्ये दिल्या होत्या. इतकं देऊनही हगवणेंनी हुंड्यासाठी वैष्णवीला त्रास दिला. या एकूण प्रकरणादरम्यान राज्यात फॉर्च्युनर कारचा मोटा गाजावाजा झाला.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. सासरी हुंड्यावरुन होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिची हत्या झाल्याचा वैष्णवीच्या कुटुंबीयांचा दावा आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळीची शिकार झाली आहे हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील हुंडाबळीची गंभीर समस्या समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.