Manikrao Jagtap | महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Manikrao Jagtap | महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
Manikrao Jagtap | महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधनSaam Tv
Published On

रायगड - महाड Mahad पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप Manikrao Jagtap यांचे निधन झाले आहे. रात्री उशिरा मुंबईमध्ये Mumbai त्यांचे निधन झाले आहेत. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची Coronaलागण झाल्याने जगताप यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात Global Hospital उपचार सुरू होते. महाराष्ट्र काँग्रेसच्या Congress अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे.आज दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,मुलगा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

हे देखील पहा -

विद्यार्थी काँग्रेस मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेस मध्ये अनेक पदे भूषवली. ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरमी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते. माणिकराव जगताप हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष होते.

Manikrao Jagtap | महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
Kargil Vijay Divas : सलाम कारगिल योद्ध्यांना ...

सध्या माणिकराव जगताप यांच्यावर रायगड जिल्हा काँग्रेसअध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीत दाखल झाले. परंतु त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com