Harshvardhan Jadhav: आधी वॉरंट, आता थेट अटक; माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा पाय खोलात

Nagpur Police Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Jadhav
JadhavSaam Tv News
Published On

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावूनही जाधव न्यायालयात हजर होत नव्हते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. सोमवारी नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Jadhav
Nandurbar Hit and Run: वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला, फॉर्च्यूनरनं आई - मुलाला चिरडलं, नंदुरबारात हीट अँड रन

रूग्णालयात दाखल

हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी त्यांच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. डॉक्टरांनी त्यांना पुढील २४ तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं. उपचारानंतर त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Jadhav
Crime News: क्रूरतेचा कहर! आईने नवजात अर्भकाला स्वच्छतागृहात फेकलं, परिसरात खळबळ

नेमकं कोणत्या प्रकरणात अटक?

२०१४ साली नागपूर विमानतळावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप होता. आरोप झाल्यानंतर सोनोगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळे आणल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com