माजी आमदार सी.ना.आलुरे गुरूजी यांचे निधन

आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आमदार सी.ना.आलुरे गुरूजी यांचे निधन
माजी आमदार सी.ना.आलुरे गुरूजी यांचे निधनकैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

तुळजापूर - तालुक्याचे माजी आमदार,शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सी.ना.आलुरे गुरुजी C.N.Alure Guruji यांचे आज पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने सोलापूरच्या Solapur अश्विनी रूग्णालयात Hospital निधन Passes Away झाले आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार माणिकराव ठाकरे यांचा पराभव करत ते आमदार झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अत्यंत साधे राहणीमान ही गुरुजी यांची ओळख होती. सिद्रामप्पा आलुरे हे 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.

हे देखील पहा -

1980 च्या निवडणुकीत त्यावेळी आलुरे याना 34 हजार 121 तर खपले यांना 19 हजार 542 मते पडली होती . 1985 ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते त्यांनी आलुरे यांचा 11 हजार 230 मतांनी पराभव केला. 1985 साली शेकापचे खपले यांना 42 हजार 553 तर काँग्रेस आयचे आलुरे यांना 31 हजार 323 मते मिळाली होती.

माजी आमदार सी.ना.आलुरे गुरूजी यांचे निधन
नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती, नो हेल्मेट नो पेट्रोल

शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुरुजी यांचे भरीव योगदान आहे. तर लातूर येथील बसवेश्वर कॉलेजच्या निर्मितीत देखील त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी बसवेश्वर कॉलेजच्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेत. त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर सहकारी बँकचे संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील काम पहिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com