Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Parbhani News : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदार बाबाजानी यांच्या अडचणीत वाढ झालीये. वाचा संपूर्ण प्रकरण
Parbhani News update
Parbhani News Saam tv
Published On

काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहेत. पाथरी येथील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली जाणार आहे. या चौकशीसाठी महसुल विभागाने SIT स्थापनेबाबत परिपत्रक काढलं आहे. या प्रकरणात संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे.

Parbhani News update
Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेस नेत्याची मोठी मागणी, पत्रात काय म्हटलंय?

पाथरीतील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी एसआयटीमध्ये विभागीय आयुक्त,परभणी अप्पर जिल्हाधिकारी,आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय,संचालक नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसआयटीने ३ महिन्यात ३ महिन्यात संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देण्याचेही आदेश दिले आहेत.

या चौकशीबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांग्रेस आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधी मांडून चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या अडचणीत वाढ झालीये.

Parbhani News update
Stray dogs : भटक्या कुत्र्यांना वाचवाल, तर कठोर कारवाई; सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा

लक्षवेधीत साजिद पठाण काय म्हणाले होते?

साजिद पठाण म्हणाले, 'परभणीत बेकायदेशीररित्या व्यापारी संकूल बांधण्यात आला. ते नियमाच्या बाहेर आहे. या बांधकामाचा अहवाल देखील आला. व्यापारी संकूल बेकायदेशीर आहे. या संकूलावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तिथे बाबाजानी प्रभावशाली आहेत, त्यांना एका पक्षाचं संरक्षण आहे. एवढी त्यांची दादागिरी आहे.

Parbhani News update
Pune Accident : पंढरीतील विठुरायाचा गजर, पिकअपमध्ये भक्तीमय वातावरण; खेडमधील अपघाताआधीचा शेवटचा व्हिडिओ समोर,VIDEO

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बाबाजानी यांचा पक्षप्रवेश

बाबाजानी यांनी ७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशपातळीवर काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात लढत असल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाबाजानी यांनी सांगितले होते. बाबाजानी दुर्राणी यांनी मागच्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com