Politics: माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या ज्येष्ठ पुत्राची भाजपात एन्ट्री; विदर्भात भाजपाची ताकद वाढली

Major Political Move: पुसदचे ययाती नाईक भाजपमध्ये दाखल; दिल्लीतील कार्यक्रमात अरुण सिंग यांच्या उपस्थितीत प्रवेश. यवतमाळ जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग.
Former Ministers Son Yayati Naik Joins BJP
Former Ministers Son Yayati Naik Joins BJPSaam Tv News
Published On

संजय राठोड, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकीय वारसा लाभलेल्या नाईक घराण्यातून भाजपमध्ये मोठी एन्ट्री झाली आहे. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि पुसदचे नेते ययाती नाईक यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.

ययाती नाईक हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नातू, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.

Former Ministers Son Yayati Naik Joins BJP
Politics: ठाकरेंना बालेकिल्ल्यात शिंदेंकडून 'दे धक्का'; निलेश राणेंच्या उपस्थितीत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात

या वेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद मेनन, राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी आणि राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक सर्वेद्र सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपस्थित सर्व नेत्यांनी ययाती नाईक यांचे पक्षात स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.

ययाती नाईक यांच्यासारखा राजकीय वारसा लाभलेला तरुण आणि प्रभावी नेता भाजपात आल्याने महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ययाती नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश ही महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात असून, विशेषतः पुसद परिसरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Former Ministers Son Yayati Naik Joins BJP
कानात हेडफोन लावून रूळ ओलांडनं पडलं महागात, महिलेचा जागीच मृत्यू; वाचवायला गेलेल्या तरूणाचाही अंत

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समिकरणे बदल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रवेशामुळे भाजपला पुसद विभागात निवडणूक लढणे सोपे होईल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com