नासमज आमदारामुळे मोर्शी वरुड च्या जनतेवर अन्याय करू नका : डॉ. अनिल बोंडे

मोर्शीतील दोन मोठे प्रकल्प पळविले; माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नासमज आमदारामुळे मोर्शी वरुड च्या जनतेवर अन्याय करू नका : डॉ. अनिल बोंडे
नासमज आमदारामुळे मोर्शी वरुड च्या जनतेवर अन्याय करू नका : डॉ. अनिल बोंडेSaamTvNews
Published On

अमरावती : मोर्शी वरुड (Morshi Warud) विधानसभा क्षेत्राचा नासमज आमदाराच्या निष्क्रियतेमुळे देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केलेले प्रकल्प इतर जिल्ह्यामध्ये हलविले जात आहे. नुकताच मोर्शी मायवाडी येथे मंजूर असलेला व निविदा निघालेला जैविक खत निर्मित कारखाना (PROM) चा कारखाना कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्वतःचा मतदार संघात मालेगावला पळविला आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्या कार्यकाळातील मंजूर झालेले मत्स्यविज्ञान महाविद्यालयला अजूनही पाठपुरावा करून अध्यापक वर्ग नेमण्यात आला नाही व वर्ग सुरु करण्यात आला नाही.

हे देखील पहा :

मत्स्यविज्ञान महाविद्यालय रत्नागिरी (Ratnagiri) येथे पळविण्यात येत आहे. मोर्शी विधानसभा क्षेत्राचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या (MLA Devendra Bhuyar) निष्क्रियतेमुळे मतदार संघाचे नुकसान होत असल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. मोर्शी येथील मायवाडी स्थित संत्रा प्रकल्पाचा जागेवर महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळा तर्फे १० कोटी रुपयांच्या जौविक खत निर्मितीचा कारखाना मंजूर करून निधी वितरीत करण्यात आला होता. या कारखानाचा बांधकामाकरिता दोन वेळा निविदा सुद्धा प्रसारित झाल्या होत्या.

नासमज आमदारामुळे मोर्शी वरुड च्या जनतेवर अन्याय करू नका : डॉ. अनिल बोंडे
पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरी

परंतु शासन बदलल्यानंतर निविदा रद्द करून कृषिमंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत असलेला हा कारखाना स्वतःच्या मतदार संघात पळविला याची जाणीवही झोपलेल्या आमदाराला होवू दिली नाही. जैविक खताचा या कारखान्यामुळे मायवाडी, भाईपुर, हिवरखेड, डोंगरयावली, चिखल सावंगी, खानापूर, पाळा, दापोरी हे प्रामुख्याने व मोर्शी तालुक्यातील असंख्य गावे या परिसारातील गाईच्या शेणावर प्रक्रिया केली जाणार होती या कारखान्यामुळे शेकडो युवकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार होता.

नासमज आमदारामुळे मोर्शी वरुड च्या जनतेवर अन्याय करू नका : डॉ. अनिल बोंडे
डोंबिवलीत धक्कादायक घटना; सोफासेट मध्ये आढळला महिलेचा मृतदेह..!

आमदाराच्या निष्क्रियतेमुळे शेकडो युवकांना रोजगाराचे नुकसान झाले आहे व गाईची शेणाचे पैसे ह्या कारखान्यामुळे होणार होते. परंतु कारखाना पळविण्याकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या जैविक खतनिर्मिती करिता १५०० वितरक महाराष्ट्र राज्यभर नेमण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची योजना होती. मोर्शीचे नाव संपूर्ण भारतभर जैविक खतासाठी प्रसिध्द होणार होते. दुर्दैवाने ती संधीही आमदाराच्या निष्क्रियतेमुळे मोर्शीकरांना गमवावी लागली अशी माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com