सांगली : महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य म्हणून सांगली जिल्ह्यातील (Sangli) यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याची ओळख आहे. हे अभयारण्य मागील अनेक दिवसांपासून समस्यांच्या गर्तेत सापडले होते. मात्र, आता वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी सागरेश्वर अभयारण्याच्या समस्या आणि विकासाचा आढावा घेत अभयारण्यातील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (Yashwantrao Chavan Sagareshwar Sanctuary)
पलुस आणि कडेगाव (Palus and Kadegaon) वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात नुकतीच मुंबईत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत सागरेश्वर अभयारण्याच्या विकासाबाबत आणि अभयारण्याच्या भोवताली शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीवरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कंपाउंड नसल्यामुळे या अभयारण्यातील प्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करत होते. त्याचबरोबर यामध्ये प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडल्या होत्या.. तसेच अभयारण्य परिसरात अवैध वृक्षतोड देखील होत होती. स्थानिक नागरिकाच्या या तक्रारीनंतरही वन विभागाकडून (Forest Department) कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आमदार अरुण लाड यांच्याकडे याबाबतीत तक्रारी केल्या होत्या.
हे देखील पाहा -
यावर आजच्या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही अभयारण्य मधील कामे प्राधान्याने करून घेण्यात येणार आहे.. तसेच या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणांकरिता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेवून वन विभागाने कामे करावीत अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत.
तसंच या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशा सक्त सूचना वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पध्दतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावे, शिवाय बैठकीनंतर या अभयारण्या संदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी अशा सूचनाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.