Forest Guard Recruitment Scam: राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा उघड; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश

राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
Forest Guard Recruitment Scam
Forest Guard Recruitment ScamSaam TV
Published On

Forest Guard Recruitment Scam: राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वनरक्षक परीक्षेचा नागपूरमध्ये फुटलेल्या पेपरवरून छत्रपती संभाजीनगरातून उत्तरे सांगितले जात होती. त्यावेळी कारवाई करण्यात आली आहे. आता या नव्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आरोग्य भरती, म्हाडा, पोलीस भरती आणि आता वनरक्षक पदाच्या भरतीमध्येही छत्रपती संभाजीनगरमध्ये गैरप्रकार समोर आला आहे. परीक्षेला बसणाऱ्यांना मोबाईलवरून उत्तरे सांगणाऱ्या किटचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Forest Guard Recruitment Scam
Jalna Crime News | गाडी धुण्याचा वाद जीवावर बेतला त्याने चक्क पोटात खंजरच घातला

छत्रपती संभाजीनगर शहराबाहेरील बजरंगनगरातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा मारून पोलिसांनी एकाला अटक केलीये तर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. अकॅडमी चालकासह त्याचे अन्य साथीदार मात्र पसार झाले. प्रत्येक उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाइलद्वारे उत्तरे सांगितली जात असल्याचे तपासात समोर आले. तसेच उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचेही स्पष्ट झालेय.

याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी विनोद प्रतापसिंग डोभाळ याला अटक केलीये तर सचिन गोमलाडू आणि लोधवाल यांच्यासह अन्य साथीदार पसार झाले आहेत.

सचिन गोमलाडू हा हे रॅकेट चालवितो. शिवराणा करिअर अकॅडमीचा तो संचालक आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेऊन तो साथीदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार होता, असे चौकशीत समोर आलं आहे.

Forest Guard Recruitment Scam
Jalgaon Crime News : भाड्याची खोली घेत मुलीवर अत्याचार; मुलासह दोन महिला ताब्यात

वनविभागात विविध संवर्गासाठी २ हजार ४१७ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यात २ हजार १३८ वनरक्षकाची पदे आहेत. ३१ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे. टीसीएस ही परीक्षा घेत आहे. त्यातला ३१ जुलैला परीक्षेचा पहिला दिवस असतानाच संभाजीनगरात वनरक्षक भरतीचा पेपर फुटला.

छत्रपती संभाजीनगरात बजरंग नगर, कलश हॉटेलच्या मागील शिवराणा करिअर अकॅडमीत बसून काही लोक वनरक्षक भरती परीक्षेतील उमेदवारांना मोबाइलवरून उत्तरे सांगत असल्याची खबर एमआयडीसी सिडको मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मूळ वनरक्षक भरती परीक्षेचा पेपर हा नागपूर येथूनच फुटल्याचं दिसले. स्पाय कॅमेऱ्याद्वारे ही प्रश्नपत्रिका छत्रपती संभाजीनगरातील टोळीकडे आली. त्यांनी हायटेक कापीद्वारे परीक्षार्थीला उत्तरे सांगितली जात होती. आता नागपूरमधून पेपर फुटल्यानंतर हा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी उघडकीस आणला.

Forest Guard Recruitment Scam
Mumbai Crime News: दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद.. दोन गटात तुफान हाणामारी; चौघांना अटक

मात्र, राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात आणि जिल्ह्यात अशाच पद्धतीने नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून याची चौकशी सुरू असल्याने पुन्हा वनरक्षक भरतीचा मोठा घोटाळाही समोर येईल अशी चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com