Satara Leopard News : अखेर बिबट्या मादी अन् बछड्यांची झाली भेट, घटना कॅमेऱ्यात कैद

Satara Latest Marathi News : हा परिसर डोंगर कपारीत असून या ठिकाणी अनेक कंपन्यांची उभारणी केली आहे. जंगली प्राण्यांचा कॉरिडॉर येथूनच जात असल्याचे प्राणीप्रेमी सांगतात.
forest department reunites three leopard cubs with mother near satara
forest department reunites three leopard cubs with mother near satarasaam tv

Satara :

सातारा शहरापासून नजीक असलेल्या मेगा फूड पार्क येथे आढळलेल्या 1 ब्लॅक पँथर आणि 2 बिबट्यांच्या पिल्लांची वन विभागाने नुकतीच मादी बिबट्यांसमवेत भेट घडवली. सर्व दृश्य कॅमेरात कैद करण्यात आल्याने ही भेट भावपूर्ण ठरल्याचे दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा येथील देगाव नजीक मेगा फूड पार्क आहे. या परिसरात काही जणांना बिबट्याची 3 लहान पिल्ले आढळली. यामुळे एकच खळबळ उडाली. या परिसरातील लाेकांनी माहिती दिल्यानूसार यामध्ये 2 बिबट्याची पिल्ले आणि 1 ब्लॅक पँथर याचा समावेश हाेता.

forest department reunites three leopard cubs with mother near satara
Sveep Awareness Program In Kolhapur : काेल्हापुरात 10 हजार 495 विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, नॅशनल रेकॉर्डसह एशिया पॅसिफीक रेकॉर्डची नोंद (video)

हा परिसर डोंगर कपारीत असून या ठिकाणी अनेक कंपन्यांची उभारणी केली आहे. जंगली प्राण्यांचा कॉरिडॉर येथूनच जात असल्याचे प्राणीप्रेमी सांगतात. एकाच ठिकाणी 3 पिल्ले आढळल्याने परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. (Maharashtra News)

या बिबट्यांच्या पिल्लांची माहिती सातारा वन विभागाला काहींनी दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही पिल्ले ताब्यात घेतली. रविवारी रात्री उशिरा बिबट्याच्या बछड्यांना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून नैसर्गिक अधिवासात त्यांना साेडण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

forest department reunites three leopard cubs with mother near satara
Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवसेनेचा विराेध मावळला, रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसैनिकांच्या 'या' अपेक्षा पूर्ण करणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com