मराठवाड्यातील पहिलं प्रादेशिक मनोरुग्णालय; 365 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता

३६५ खटांच्या मनोरुग्णालयाला आज राज्याच्या मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील पहिलं प्रादेशिक मनोरुग्णालय; 365 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता
मराठवाड्यातील पहिलं प्रादेशिक मनोरुग्णालय; 365 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता लक्ष्मण सोळुंके
Published On

जालना: राज्यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी या चार ठिकाणी कार्यरत असलेल्या मनोरुग्णालयाच्या धर्तीवर जालन्यात (Jalna Hospital) ३६५ खाटांच्या मनोरुग्णालयाला आज राज्याच्या मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली आहे. या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी एकूण रुपये १०४.४४ कोटी एवढा अंदाजित खर्च अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा विभागासाठी एक ही प्रादेशिक मनोरुग्णालय नसल्याने त्या बाबद मागणी केली जात होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा ही केला जात होता. मराठवाडा व विदर्भातील किमान १० जिल्ह्यांच्या मध्यवर्ती जालना शहर असून या भागातील रुग्‍णांना उपचारा करिता पुणे अथवा नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्‍णालयात दाखल करावे लागते.

मराठवाड्यातील पहिलं प्रादेशिक मनोरुग्णालय; 365 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता
31 लाख रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

राष्ट्रीय मानिसक आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेता मराठवाड्यातील रुग्णांसाठी या भागात मनोरुग्णालय सुरू करणे आवश्यक होते.मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय सुरू झाल्यास याभागातील रुग्णांची सोय होणार आहे. जालना येथे शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी अथवा भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक ती पदनिर्मिती आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून तात्काळ मनोरुग्णालय सुरू केले जाईल. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, ईसीटी विभाग, व्यवसाय उपचार विभागांतर्गत संगीत उपचार, योगा उपचार व विविध उपक्रम, चाचणी प्रयोगशाळा, समुपदेशन विभाग आदि सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com