Ratnagiri News : विदर्भातील काँग्रेसच्या माजी आमदाराने केली राजापूरात 20 एकर जमीन खरेदी; जाणून घ्या कारण

Ratnagiri Politics : कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी विदर्भातील माजी आमदार यांच्या नावे जमीन खरेदी?
Ratnagiri News
Ratnagiri NewsSaam Tv

रणजीत माजगांवकर

Konkan Refinery Project : कोकणातील नाणार इथला रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावसह आसपासच्या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या परिसरात जमीनी खरेदी करण्याचा धडाकाच लावलल्याचं समोर आलं आहे. एका विदर्भातील काँग्रेसच्या माजी अमदाराने तर थेट राजापूरातच जमीन खरेदी केली आहे.

Ratnagiri News
Jalna News: ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठीच्या सुविधा नसल्यानं रुग्णाहिकेतच प्रसुती

कोकणातील (Konkan) प्रस्तावित रिफायनरीच्या जागी विदर्भातील काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नावे जमिनीची खरेदी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. राजापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवाडकर यांनी राजापूर भूमी अभिलेख कार्यालयातून मागवलेल्या कागदपत्रांनंतर बाब समोर आली आहे.

2022 मध्ये आशिष रणजीत देशमुख यांच्या नावे एकूण जवळपास 20 एकर जमिनीची खरेदी झालेली आहे. राजापूर तालुक्यातीलच बार्शी (Barshi) या गावाला लागून असलेल्या सोलगावमध्ये ही जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. जमीन खरेदीची संपूर्ण रक्कम 55 ते 56 लाखांच्या घरात आहे. शिवाय मागील वर्षात दीड वर्षांमध्ये याच संपूर्ण भागामध्ये शेकडो एकर जमिनीचे खरेदी आणि विक्रीचे व्यवहार झाल्याचा दावा देखील समीर शिरवडकर यांचा आहे.

Ratnagiri News
NCP : भाजप नेत्याचा पाय माेडला, मारहाण प्रकरणी 'एनसीपी' च्या आमदारासह पत्नी, व्यापा-यावर गुन्हा दाखल

मागच्या काही दिवसांमध्ये कोकणात रिफायनरी होणाऱ्या भागांमध्ये राजकीय लोक देखील जमीन खरेदी विक्री करत असल्याचे आरोप झाले होते. पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती संशयास्पद मृत्यूनंतर उदय सामंत यांच्यावर झालेल्या आरोपानंतर या भागात माझी जमीन असल्यास मी राजकारण सोडून असं म्हणत आरोप करणाऱ्यांना प्रतिउत्तर दिलं होते.

अशा प्रकारची चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असताना अता थेट विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांच्याच नावाची जमीन या भागात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी रिफायनरीचा प्रकल्प हाेणार असल्याने गुतंवणुक म्हणून आमदारांनी जमीन खरेदी केली असावी असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com