"वाळू माफियांवर नव्हे तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"

मेटे यांनी मयत मुलांच्या भावांना शिक्षणासाठी दत्तक देखील घेतल्याचे जाहीर केले.
"वाळू माफियांवर नव्हे तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"
"वाळू माफियांवर नव्हे तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"SaamTvNews
Published On

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजापुर चकला येथे, वाळू माफियांनी वाळू उपश्यासाठी सिंदफना नदीपात्रात केलेल्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झाला होता. याच मयत बालकांच्या कुटुंबाची आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आज भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान मेटे यांनी मयत मुलांच्या भावांना शिक्षणासाठी दत्तक देखील घेतल्याचे जाहीर केले. मुलांच्या मृत्यूनंतर चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पाहा :

मात्र, हे गुन्हे महसूल आणि पोलिस (Police) अधिकाऱ्यावर झाले पाहिजे. अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी यावेळी केलीय. मागासवर्गीय मुलांचा वाळू माफियांमुळे (Sand Mafia) मृत्यू होतो. मात्र सामाजिक खात्याचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना याचं कसलंच गांभीर्य नाही. मुलांना मदत म्हणून निदान दहा लाख रुपयांचे पॅकेज घोषित करावं. अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी यावेळी केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

"वाळू माफियांवर नव्हे तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"
वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com