Laxman Hake on Maratha Aarakshan
Laxman Hake on Maratha AarakshanSaam TV

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर गंभीर गुन्हे दाखल करा; अन्यथा आत्मदहन करेन, विभागीय आयुक्तांना कुणी दिला इशारा?

Manoj Jarange Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने गंभीर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन करेन, अशी मागणी एका व्यक्तीने विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Published on

मनोज जरांगे पाटील हे गेल्या ६ महिन्यांपासून चुकीच्या मागण्या करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गंभीर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर आत्मदहन करेन, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.

या पत्रामुळे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस विभागासह यंत्रणा हादरली आहे. धनराज गुट्टे व्यक्तीने मेलद्वारे हे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. या पत्राची आयुक्तांनी दखल घेतली असून या पत्राची एक प्रत मुंबई सचिव कार्यालयाला पाठवली आहे.

त्यामुळे येणाऱ्या जरांगे यांच्याविरुद्ध काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांना आज रुग्णालयात डिचार्ज मिळाला असून ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. येणाऱ्या १३ तारखेला मोठा धमाका होणार, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Laxman Hake on Maratha Aarakshan
Maratha Reservation : मराठा समाज मागास असेल तर त्यांच्या पुढे कोण गेलंय? लक्ष्मण हाके यांचा तिखट सवाल

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

रुग्णालयातून डिचार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले "आता मी थेट अंतरवाली सराटीला जाऊन देवाचे दर्शन घेणार आहे. सर्वजण म्हणत आहे की हे मराठ्यांचं राज्य आहे. तर मग मराठा समाजावर अन्याय का करताय? मी धनगर बांधवांना आणि यांच्या नेत्याला विरोधक मानत नाही. पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभराजे देसाई म्हणाले आहेत 13 जुलै पर्यंत थांबा", असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

डॉ. तारख यांच्या तोंडाला सोमवारी मराठा समाजाने काळं फासलं होतं. त्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला त्या घटनेबद्दल वाईट वाटले. आंदोलनाला गाल बोट लावण्याचे काम चांगले नाही. डॉक्टरकडून एक चूक झाली असेल ते आम्ही सोडून दिले आहे. शेवटी समाजाचे आंदोलन आहे", असं जरांगे यांनी म्हटलंय.

Laxman Hake on Maratha Aarakshan
VIDEO : मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला; संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com