Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करा, मराठा समाजाची मागणी; काय आहे प्रकरण?

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : मनोज जगांगे पाटील यांनी सभेत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली होती.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte SaamTvnews
Published On

Jalna News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधव राज्यभरातून जालन्यात दाखल झाले होते. या सभेआधी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करत जोरदार टीका केली होती.

गुणरत्न सदावर्ते यांनी साम टीव्हीला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत वापरलेल्या शब्दांवर मराठा समाजाने आक्षेप घेतला आहे. आम्ही आमच्या स्व खर्चाने आमच्या न्याय हक्कांसाठी लढत असताना मनोज जरांगे यांची जत्रा, लॉयल डॉग, विना पेंद्याचा लोटा, लावले रताळ उगली केळ, अशा शब्दांचा प्रयोग करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Gunratna Sadavarte
Contract Recruitment : कंत्राटी भरतीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा आरोप

गुणरत्न सदावर्ते यांनी अशी भाषा वापरुन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, शिवाय दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. (Political News)

आपण महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या(हिंसक) विचाराचे असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं. तसेच अंतरवाली सराटी येथील महासभेदरम्यान लाखो लोकात संभ्रम निर्माण करुन भीती वाटेल असं कृत्य केलं. या प्रकारणी त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.

Gunratna Sadavarte
Crime News: अमेरिका पुरती हादरली; घरमालकानं ६ वर्षीय पॅलेस्टिनी मुलाला निर्घृणपणे संपवलं, २६ वेळा केले वार

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 17 ऑक्टोबरपर्यंत गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com