Paper Copy : राज्यात सध्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशात काही दिवसांपूर्वी बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशात आता कॉपीची आणखी एक घटना समोर आली आहे. (Latest 12th Paper Copy News)
शाळेमध्ये कॉपी सुरू आहे असं सांगत पालक आणि शिक्षकामध्ये राडा झाला आहे. वर्गात परीक्षा सुरू असताना विद्यार्थी कॉपी करत होते. तसेच वर्गात काही विद्यार्थी त्यांच्या पालकांसह आले होते. हे दुसऱ्या एका पालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी शिक्षकांना याची माहिती दिली. दुसरे पालक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत आहेत असं ते शिक्षकांना सांगत होते. c
याच कारणावरून पालक आणि शिक्षकांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. हे भांडण मिटवण्यासाठी पोलीस देखीलमध्ये पडले. शाळेत कॉपी सुरू आहे असं पालकाच म्हणणं होतं. यावरून पालकाने शिक्षकाला धक्काबुक्की केली असं शिक्षकाने म्हटलं आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत हा राडा झाला आहे.
या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पालक आणि शिक्षक एकमेकांना ढकलत आहेत. तसेच पोलीस या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतायत. एवढ्या भांडणात वर्गात बसलेल्या मुलांना देखील पेपर लिहिन्यात अचणी आल्या. तर काहींनी याच भांडणाचा फायदा घेत दोन तीन प्रश्नांची उत्तरे मिळवली.
पोलीसांनी दोन्ही बाजू ऐकूण हा वाद थांबवला आहे. वाद शांत झाल्यावर परीक्षा पुन्हा सुरळीत सुरू झाली. राज्यात कॉपी मुक्त परीक्षेसठी मोठी सक्ती केली जात आहे. मात्र बुलढाण्यात झालेल्या घटनेला राजकीय वळण देखील मिळालं होतं. गणिताचा पेपर फुटल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. अशात आता पुन्हा एकदा कॉपीवरून छत्रपती संभाजी नगरमध्ये पालक आणि शिक्षकामध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ समोर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.