Kolhapur: 31 वर्षापूर्वी तयार केलेली, अंबाबाईची 51 किलो चांदीची मुर्ती देवस्थानाकडे सुपूर्त

सदरची श्री अंबाबाई देवीची ५१ किलो चांदीची मूर्ती ही लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे.
Ambabai
Ambabaiसंभाजी थोरात
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडून (Kolhapur Bullion Traders Association) तयार करण्यात आलेली श्री करवीर निवासिनी अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती (51 kg Silver Idol) आज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. या निमित्त कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होत. रांगोळी, आकर्षक रोषणाई या बरोबरच धनगरी ढोल आणि वाद्यांचा गजरात निघालेल्या या शोभायात्रेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

कोल्हापूर (Kolhapur) सराफ व्यापारी संघाने ५१ किलो वजनाची श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती विधिवत शोभायात्रा काढून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं आज सुपूर्द करण्यात आली. या शोभायात्रेची सुरवात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि माजी राज्यपाल डॉ. डी.वाय पाटील यांच्या हस्ते गुजरी कॉर्नर येथून करण्यात आली.

Ambabai
'उध्दव ठाकरे 'मविआ'च्या चक्रव्युहात अडकलेत, त्यांनी सरकारमधुन बाहेर पडावं'

सध्या अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीची अभिषेकामुळे झीज होत आहे. आणि याच कारणामुळे कोल्हापूर सराफ संघाने ३१ वर्षापूर्वी तयार केलेली अंबाबाईची चांदीची मूर्ती तयार केली असून ही मूर्ती काही कारणामुळे देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली नव्हती. ती आज अखेर देवस्तान समितीकडे देण्यात आली आहे. सदरची देवीची मुर्ती श्री अंबाबाई देवीची ५१ किलो चांदीची मूर्ती ही लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com