Satara: पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशी

वडिलांबरोबर शेतात काम करत असलेल्या एका चिमुरड्यावर बिबट्याने झडप घातली
Satara: पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशी
Satara: पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशीSaam Tv
Published On

सातारा: वडिलांबरोबर शेतात काम करत असलेल्या एका चिमुरड्यावर बिबट्याने (leopard) झडप घातली आहे. अवघ्या काही क्षणामध्ये त्या चिमुरड्याला आपल्या जबड्यामध्ये पकडून भक्ष बनवू बघणाऱ्या बिबट्यासमोर (leopard) बाप उभा राहीला. बापाने तब्बल १० मिनिट बिबट्याशी झुंज दिली आहे. आपल्या पोटच्या लेकराकरिता बापाने आपल्या जिवाची परवा केली नाही. अखेर बिबट्याने हार मानली आणि मुलाला सोडून धूम ठोकली आहे.

हे देखील पहा-

कराड (Karad) तालुक्यातील येणपे गावात (village) काही दिवसांपूर्वी एक ऊसतोड मजूराच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने आणखी एक हल्ला केला आहे. किरपे गावातील धनंजय देवकर हे आपला मुलगा राज (वय- ५) याच्याबरोबर शेतात (Farm) काम करत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंधार पडला असता घरी निघण्याच्या तयारी होते. ते दोघे शेतात साहित्य पिशवीमध्ये भरत असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने राजवर झडप घातली.

Satara: पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशी
Pune School Reopen: पुण्यातील शाळा सुरु होणार का? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

बिबट्याने राजची मान जबड्यात पकडून फरपटत नेहण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यातच राजने जोरात ओरडण्यास सुरुवात केली. राजचा आवाज एेकून बापाने मागे वळून बघितले असता बिबट्या आपल्या लेकराला भक्ष बनवत असल्याचे लक्षात येताच धनंजयने बिबट्याच्या दिशेने जोरात धाव घेतली. धनंजय बिबट्यावर तुटून पडला. आणि बिबट्याच्या तोंडातून राजला ओडण्याचा प्रयत्न करु लागला. खूपच वेळ प्रयत्न केल्यावर अखेर बिबट्याने राजला जमिनीवर टाकून तिथून पळ काढला आहे.

सुमारे १० मिनिट बिबट्या आणि देवकर यांच्यामध्ये सुरु असलेल्या झटापटीचा प्रसंग धरकाप आणणारा होता. या हल्लामध्ये राज जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव राक्षक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, किरपे गावचे पोलीस (Police) पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून यावेळी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com