सोयाबीनच्या बाजारात भ्रष्टाचाराचे दलाल, मंत्र्याच्या OSDच्या नावानं लाखोंची मागणी

Minister’s OSD Soybean Purchase Scam Unearthed: अतिवृष्टीतही शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जपलेला सोयाबीन आता बाजारात येण्यास सुरुवात झालीय...मात्र सोयाबीनच्या बाजारात भ्रष्टाचाराचे दलालांनी हैदोस घातलाय... मात्र खरेदी केंद्रासाठी किती रुपयांची मागणी केली जातेय... आणि शेतकऱ्यांची कशी पिळवणूक केली जातेय..
Soybean vehicles stranded at NAFED centre as farmers allege massive bribery and rejection scam
Soybean vehicles stranded at NAFED centre as farmers allege massive bribery and rejection scamSaam Tv
Published On

आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर बाजारातील भ्रष्टाचारी सुलतानी दलालांनी डल्ला मारायला सुरुवात केलीय.. अकोल्यातल्या अकोटमधील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनची अनेक वाहनं सोयाबीनची खरेदी न केल्यानं अडकून पडलेत... मात्र या शेतकऱ्यांच्या अडवणुकीमागे आर्थिक रॅकेट दडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रति वाहन 5 हजार रुपये वसुल केले जात आहेत... असा आरोप करत शेतकऱ्यांनी लाचखोर ग्रेडर आरुष पटेलचा भांडाफोड केलाय...

मात्र सोयाबीन खरेदी केंद्रावर कशा पद्धतीने घोटाळा केला जातो... त्याची शेतकऱ्यांनी सांगितलेली मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे..प्रति वाहन 5 हजार रुपये न दिल्यास माल नाकारणे मालाची प्रतवारी कमी करणे, वाहनं जास्त वेळ अडवून ठेवणे

अकोलाच नाही तर नांदेड आणि यवतमाळमध्येही नाफेडची सोयाबीन केंद्र भ्रष्टाचाराचे अड्डे बनत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... त्याचे पडसाद अधिवेशात उमटलेत... काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी थेट सोयाबीनच्या पिशव्या विधानसभेत घेऊन जात लाचखोर अधिकाऱ्यांकडून उत्तम दर्जाचं सोयाबीन नाकारलं जात असल्याचा आरोप केलाय.... बीडमधील अखिल काझी नावाचा व्यक्ती पणनमंत्री रावल यांच्या ओएसडीच्या नावाने सोयाबीन केंद्रासाठी 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

खरंतर राज्यात पणन विभागाने नाफेडच्या 786 सोयाबीन केंद्रांना मंजूरी दिलीय... त्यापैकी नाफेडच्या नियमांवर बोट ठेवत 461 केंद्रच सध्या सुरु आहेत... सध्या केंद्र सरकारने सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव जाहीर केलाय... मात्र खरेदी केंद्रावर हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीनची खरेदी केली जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय...

निवडणुकीआधी सोयाबीनला 6 हजार रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं... मात्र निवडणुकीनंतर केंद्र सरकारने 5328 रुपयांचा हमीभाव दिलाय...मात्र शेतकऱ्यांची साडे चार हजारांवर बोळवण केली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे यावर सरकार काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com