कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातचं चंदनाच्या शेतीचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक

चंदनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय
farmers
farmersअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक - राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातचं शेतकऱ्यांची (Farmer) लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चंदन लागवडीचं आमिष दाखवून परप्रांतीय टोळीकडून लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पुष्पा चित्रपटाचं गारुड सध्या सर्वांवर पाहायला मिळतं आहे. या चित्रपटात रक्त चंदनाला जागतिक बाजारपेठेत असणारी मागणी आणि त्याच्या तस्करीतून मिळणा-या कोट्यवधी रुपयांनी अनेकांना मोहिनी घातलीय. नेमकी हीच बाब हेरुन आंध्रप्रदेशातून आल्याचं सांगत 7 ते 8 जणांच्या टोळीनं नाशिक जिल्ह्यातील भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट केली आहे.

हे देखील पहा -

श्री लक्ष्मी गणपती नर्सरीच्या नावाच्या कंपनीच्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील देवळा, मालेगाव, चांदवड तालुक्यातील हद्दीवरील गिरणारे, कुंभारडे,, झाडी, कोकणखेडे, उसवाड या गावातील शेतकऱ्यांना चंदनाची लागवड करण्याचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातलाय. शेतकऱ्यांचे लाखो रुपये घेऊन या टोळीनं पोबारा केल्यानं आता गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचं धाबं दणाणलय. चंदनाचे झाड लावण्यासाठी प्रति झाड 200 रुपये भरा. त्याबल्यात 2000 हजार रुपये अनुदान देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही सरकारी योजना असून सरकारी अधिकारी स्वतः येऊन तुम्हाला अनुदान वाटप करतील, असं या टोळीकडून सांगण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यांनी काही शेतकऱ्यांना चंदनाची रोपंही आणून दिली. जास्त रोपं घेतली, तर बोअरवेल, तारेचं कुंपण आणि चंदनाच्या झाडाच्या येणाऱ्या उत्पादन खरेदीची हमी दिल्यानं शेतकऱ्यांनी यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. कुणी लाख, 2 लाख अशा पद्धतीने लाखो रुपये टोळीकडे जमा केले. मात्र आता 5 ते 6 दिवसांपासून या टोळीनं आपला गाशा गुंडाळत पोबारा केला असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं शेतकरी हवालदिल झालेत.

farmers
Nanded Accident: अपघातात नवरीसह पाच जणांचा मृत्यू, ६ जखमी

पुष्पा चित्रपटात रक्त चंदनामुळे अनेक जण मालामाल झाल्याचं दाखवण्यात आल आहे. त्यामुळे याला भुलून लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मात्र आमिषापोटी लाखो रुपयांची लूट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा महाठगांवर कठोर कारवाईची गरज असून शेतकऱ्यांनीही आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अशा ठगांच्या टोळ्यांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com