धक्कादायक! वैतागून शेतकऱ्यानं दिला तीन एकर ऊस पेटवून

राज्यात ऊसाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. ऊस कारखान्याला जात नाही म्हणून वैतागून तीन एकर ऊस पेटवून दिला आहे.
Latur Farmer news
Latur Farmer news Saam Tv
Published On

लातूर : राज्यात ऊसाचा (sugarcane) प्रश्न गंभीर होत चालला आहे. ऊस कारखान्याला जात नाही म्हणून वैतागून तीन एकर ऊस पेटवून दिला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील साई गावात हा शेतकरी राहतो. हाणमंत किसन पवार असं शेतकऱ्याचं नाव आहे. ऊस पेटवण्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याचा सुमारास घडली आहे. या घटनेने गावात या शेतकऱ्याबद्दल (Farmer) एकच चर्चा सुरू झाली आहे. ( Latur Farmer News In Marathi )

हे देखील पाहा -

लातूरसहित राज्यातही अतिरिक्त ऊसाच्या समस्येने शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रात दोन-चार दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात लातूर जिल्ह्यात अद्याप किमान हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकरी ताणतणावात आहे. अतिरिक्त ऊसाच्या समस्येला वैतागून लातूरच्या एका शेतकऱ्याने धक्कादायक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या या निर्णयाची संपूर्ण साई गावात होऊ लागली आहे.

Latur Farmer news
Agni-4 Missile: भारताने घेतली अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

लातूरच्या साई गावातील हाणमंत किसन पवार या शेतकऱ्यानं तीन एकरात ऊसाच्या पीकाची लागवड केली होती. मात्र हंगाम संपत आला तरी ऊस कारखान्याला जात नसल्याने अक्षरश: पेटवून दिला आहे . तळहातांच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या ऊसाला स्वत:च्या हाताने हतबल होऊन पेटवून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. साई गावातील शेतकऱ्याच्या कृत्याने गावात एकच चर्चा सुरू झाली आहे. हाणमंत यांनी ऊसाचे पीक पेटवून दिल्यानंतर आता इतर शेतकऱ्यांपुढे या समस्येपुढे काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कष्टाने पीकवलेला ऊस पेटवावा लागत असल्याने पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब पुढे आली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com