Amravati: डोक्यावर कर्जाचा डोंगर, शेतकरी हवालदिल; खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं

Farmer Takes Own Life in Amravati: शेतकरी मारूती डावरे यांनी थकीत कर्जाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या डावरे यांनी गळफास लावून जीवन संपवले.
Farmer
FarmerSaam tv
Published On

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील ठाकुलगाव येथील शेतकरी मारूती डावरे यांनी थकीत कर्जामुळे आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचणीत आणि मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी स्वतःला गळफास लावून आयुष्य संपवलं आहे.

मारूती डावरे हे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते. त्यांच्याकडे केवळ ३ एकर शेती असून, स्टेट बँक ऑफ इंडियाचे १ लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर थकीत होते. खरीप हंगाम सुरु होत असताना बियाणे आणि खत खरेदीसाठी लागणारी रक्कम त्यांच्याकडे नव्हती. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्याची शक्यताही नव्हती, याची जाणीव त्यांना होती.

Farmer
Beed Crime: बीडमध्ये सरपंचाची गुंडगिरी, महिला- पुरूषांना काळं निळं होईपर्यंत मारलं, दगडफेक करत..

या ताणतणावाखाली येत त्यांनी गळफास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं. ही घटना समजताच गावात शोककळा पसरली असून, डावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Farmer
Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com