Raju Shetti: स्वाभिमानी 'इंडिया' आघाडीत सामील होणार का? नाना पटोलेंचा फोन आल्यानंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?

Raju Shetti: नाना पटोले यांनी माजी खासदार राजू शेट्टी 'इंडिया' सहभागी होण्यासाठी फोन केला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Raju Shetti: स्वाभिमानी 'इंडिया' आघाडीत सामील होणार का? नाना पटोलेंचा फोन आल्यानंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?

Raju Shetti News In Marathi

विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांकडून अनेक राजकीय पक्षांना आघाडीत सहभागी करून प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी खासदार राजू शेट्टी 'इंडिया' सहभागी होण्यासाठी फोन केला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी सध्या सांगलीत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, 'नाना पटोले यांचा गेल्या आठवड्यामध्ये फोन आला होता. परंतु आमच्या संघटनेचा अजून निर्णय झालेला नाही असं मी त्यांना सांगितलं. 2021 ला आम्ही महाविकास आघाडी सरकारशी सगळे संबंध तोडलेले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले'.

Raju Shetti: स्वाभिमानी 'इंडिया' आघाडीत सामील होणार का? नाना पटोलेंचा फोन आल्यानंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
Pandharpur Thackeray Group News: पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, ३०० पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

'ऊसाची एफआरपी देण्याचा निर्णय आणि दुसरा भूमिअधिग्रहन कायदे हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होते. त्यामुळे आम्ही आघाडीशी संबंध तोडलेले होते. आम्ही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आमचं म्हणणं काय आहे याची साधी चौकशी सुद्धा त्यांच्या नेत्यांना वाटली नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करतो आणि जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गॅरंटी मिळत नाही. अशा लोकांसोबत आम्ही थांबत नाही, असेही ते म्हणाले.

राजू शेट्टी पुढे म्हणाले, 'इथेनॉलवर चालणारी कार नितीन गडकरींनी यांनी सादर केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. कारण कधी ना कधी आपल्याला पेट्रोलला पर्याय शोधावा लागेल. शिवाय इथेनॉल शेतकऱ्यांचे इंधन आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत केलं पाहिजे'.

Raju Shetti: स्वाभिमानी 'इंडिया' आघाडीत सामील होणार का? नाना पटोलेंचा फोन आल्यानंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Latest News: इंडिया आघाडीकडे PM पदासाठी अनेक पर्याय, पण NDA कडे मोदींशिवाय पर्यायच नाही: उद्धव ठाकरे

'साखरेचा अतिरिक्त उत्पादनाचा पर्याय इथेनॉल निर्मिती हाच आहे. परंतु त्याला पूरक असं केंद्र सरकारचा धोरण असणं गरजेचं आहे. कारण आजही पेट्रोलचा उत्पादन खर्च आणि इतरांचा उत्पादन खर्च याच्यामध्ये फरक आहे. इथेनॉलचा उत्पादन खर्च पेट्रोलच्या उत्पादन खर्चा पेक्षा जास्त आहे. परंतु पेट्रोलवर कराची आकारणी प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने पेट्रोल महाग दिसतं, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com