Buldhana News: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन; देऊळगाव घुबे येथील घटना, गावात हळहळ

कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv
Published On

Buldhana Farmer News: कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे ही घटना उघडकीस आली. चिनकुबा घुबे (६५, रा. देऊळगाव घुबे, ता.चिखली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Kalyan Crime News: पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न; आरोपीला तब्बल २ वर्षांनी ठोकल्या बेड्या

चिनकुबा घुबे यांच्याकडे ६ एकर शेती आहे. त्यांच्यावर इंडियन ओव्हरसिस बँकेचे २ लाख रुपये कर्ज होते. सातत्याने होणारी नापिकी यामुळे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. त्यातच यंदा जून अर्ध्यापेक्षा संपून देखील अपेक्षित पाऊस न आल्याने उत्पन्न होईल का या विवंचनेत ते होते. (Buldhana News)

गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या एका झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Buldhana News
Fire Broke In Bhiwandi: भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; गोदामाला भीषण आग, कोट्यवधींच नुकसान

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अंढेरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिनकुबा घुबे यांना गावात महाराज म्हणून ओळखत होते. अध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड रुची असलेल्या चिनकुबा घुबे यांनी टोकाचे पाऊल उचलण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com