बुलढाणा : शेतकऱ्याच्या Farmer 2 एकर शेतातील field सोयबिन Soybeans पावसाअभावी करपले, डोक्यावर बँकेच्या Bank कर्जाचा डोंगर, खाजगी कर्ज, यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सहन न झाल्याने शेतकऱ्याने कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या suicide केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना खामगाव Khamgaon तालुक्यातील किन्ही महादेव Kinhi Mahadev या ठिकणी घडली आहे. श्रीकृष्ण सारंगधर तिवाने, (वय- 44) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हे देखील पहा-
बुलढाणा Buldhana जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामधील शेतकरी श्रीकृष्ण तिवाणे यांच्याकडे कीन्ही महादेव शिवारात २ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरलेले होते. मात्र, पाऊस नसल्याने २ एकरात पेरलेल्या संपूर्ण सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता आपल्यावर असलेल कर्ज कसे फेडायचं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. या विवंचनेत शेतकरी श्रीकृष्ण तिवाणे हे होते.
त्यामुळे शेतकरी श्रीकृष्ण यांनी किन्हि महादेव शिवारातील बाळू बाप्पा कराडकर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन, आत्महत्या केली आहे. मृतक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी आणि यांच्यावर असलेले कर्ज माफ करावे अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1मुलगा,1मुलगी असा परिवार आहे. मात्र, या आत्मत्येमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होते आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.