Balya Singer : शहापुरातील प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे याचा अपघाती मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध आदिवासी गायक 'बाळा रतन दिवे' उर्फ बाळ्या सिंगर याचा मृत्यू झाला आहे.
balya singer
balya singer saam tv
Published On

Balya Singer News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील प्रसिद्ध आदिवासी गायक (Singer) 'बाळा रतन दिवे' उर्फ बाळ्या सिंगर याचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करताना बाळा दिवे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, बाळा दिवे याचा नेमका मृत्यू कसा झाला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बाळा याच्या ४ मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.

balya singer
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

बाळा दिवे हा गुरुवारी रात्री सोनुभाऊ बसवंत कॉलेज जवळील पळपाडा येथील नदीवर मासामारीसाठी गेला होता. मात्र, त्याच नदीकिनारी बाळा दिवेचा तरंगताना आढळल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा बुडून मृत्यू कसा होऊ शकतो, यावरही अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

balya singer
रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक; मोठा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत खलबतं

बाळा दिवे याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बाळा दिवेच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आंदराजली वाहिली जात आहे. बाळा दिवेचे गाणे नेहमी आठवणीत राहतील, अशा भावना त्याच्या चाहत्याकडून व्यक्त केल्या जात आहे.

आदिवासी समाजातील बाळ्या सिंगरने मासेमारी करत आपल्या शहापूर तालुक्यात कमी कालावधीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली. बाळ्या सिंगरच्या गाण्याचा मोठा चाहता वर्ग होता. बाळ्या सिंगर 'आग पोरी तू स्वप्नात ये ना' या गाण्यामुळे घराघरात पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com