Crop 1rs Insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ रुपये पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
Crop 1rs Insurance
Crop 1rs Insuranceसंजय जाधव
Published On

Beed News: शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीकविमा काढण्यासाठी 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीये. कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

धनंजय मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी १ रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा ही विनंती. असं धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Crop 1rs Insurance
Pune Crime News: पुण्यातील २ दहशतवाद्यांकडून धक्काकायक माहिती उघड; मुंबईची सुरक्षा वाढवली

१ रुपयात पीक विमा यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती. यासाठी अंदाजे ३,३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते.

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. किड, रोगामुळे होणारे नुकसान, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार येणार आहे.

Crop 1rs Insurance
Political News: कर्जत-जामखेड एमआयडीसीला मिळणारी जमीन नीरव मोदीची; राम शिंदेंच्या दाव्याने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com