Ratnagiri News: कोकणातील रिफायनरी प्रकल्प बारसू येथे सुरू आहे. प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली असून सध्या बोअर मारण्याचे काम होत आहे. या प्रकल्पाला बारसू येथील नागरिकांकडून तिव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प कोकणातल्या बारसू येथेच होणार असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या दूर करण्याची तयारी फडणवीसांनी दर्शवली आहे. एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. (Latest Political News)
रिफायनरी प्रकल्पात एकून तीन कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला प्रकल्प सुरू केला आहे. सदर प्रकल्पामुळे एक लाख व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच याने राज्याचा मोठा विकास होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
रिफायनरीमुळे निसर्गाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास कसा होईल याकडे आमचं लक्ष आहे. आंदोलकांच्या मनात या प्रकल्पावरून अनेक शंका आहेत. त्या शंका दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे.
रिफायनरीसाठी बारसूमधील जागा योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही. त्यामुळे आपण हा प्रकल्प अखंडितपणे राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हा प्रकल्प एकाच ठिकाणी कोकणात उभा राहत आहे. रिफायनरी विरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे नागरिक विरोध करत असल्याचं फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्प आला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकारनेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. मात्र ता त्यांची भूमिका विरोधाची आहे. सदर प्रकल्पात आरेतील कारशेडलादेखील विरोध करण्यात आला होता. कोणताही प्रकल्प आला तर त्याच्या कामासाठी विरोध केला जातोय, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.