भंडा-यात लहान मुलांच्या जीवाशी खेळ? महिला व बाल विकास अधिका-यांनी घेतलं गांभीर्यानं, दिले चाैकशीचे आदेश

Bhandara Anganwadi News : ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येताच याची लगेच माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमांतून महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात आली.
expiry date nutrition diet supplied to anganwadi in bhandara
expiry date nutrition diet supplied to anganwadi in bhandaraSaam Digital

- शुभम देशमुख

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा केला जात असल्याचा प्रकार समाेर आला आहे. यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा राेष व्यक्त हाेऊ लागला आहे. संबंधित पुरवठा कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडीत मुदतबाह्या पोषण आहार पुरवठा करण्यात आला आहे. ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येताच याची लगेच माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमांतून महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.

expiry date nutrition diet supplied to anganwadi in bhandara
राेहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता : अमाेल मिटकरी

ह्या पोषण आहाराची मुदत एका महिन्या आधीच संपली असताना अंगणवाडी केंद्रात याचा पुरवठा कसा करण्यात आला. जर ही बाब लक्षात आली नसती तर लहान मुलांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे असा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशीची आदेश दिले

हा प्रकार लक्षात येताच महिला बाल विकास अधिकारी यांनी संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. आणखी किती अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा केला गेला याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मनिषा कुरसूंगे (महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

expiry date nutrition diet supplied to anganwadi in bhandara
Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com