खासगी बसनं प्रवास करताय? भाड्यात तिपटीनं वाढ; ऐन दिवाळीत प्रवाशांचं दिवाळ निघणार!

Expensive Bus Travel: ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांच्या खिशाला कात्री. खासगी बसच्या तिकीटात तिप्पट वाढ.
Diwali Travel Shock
Diwali Travel ShockSaam
Published On
Summary
  • दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल्स बसचा प्रवास महागणार.

  • प्रवाशांच्या खिशाला झळ.

  • मोठ्या शहरात प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार.

दिवाळीच्या काळात खासगी बसने प्रवास करणार असाल तर, तुमच्या खिशाला कात्री बसू शकते. छत्रपती संभाजीनगरहून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना दुप्पट - तिप्पट दरानं तिकीट घ्यावे लागणार आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढीचा 'गीअर' टाकला असून याचा फटका सामान्यांना बसणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरात जाण्यासाठी आता तुम्हाला जादा पैसे मोजावे लागतील. छत्रपती संभाजीनगरहून नागपुरात जाण्यासाठी ४ हजार, तर मुंबईसाठी २,५०० रूपये इतकं भाडं मोजावे लागणार आहे.

जीएसटीत दिलासा नाहीच

अलीकडेच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सामान्यांना दैनंदिन वस्तूंवर दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकघरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत दर कमी झाले आहे. या सुधारणात खासगी ट्रॅव्हल्स प्रवासासाठी जीएसटीची सवलत मिळणे अपेक्षित होतं.

Diwali Travel Shock
२ लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेला, १५६ जनावरं दगावली; अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू, सोलापूरात पावसांचं रौद्ररूप

मात्र, अजूनही ट्रॅव्हल्स तिकीट बुकिंगवर ५ टक्के जीएसटी कायम आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. आता सणावारांचे दिवस आहेत. त्यामुळे सामान्यांचा प्रवास अधिक महागणार आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंग महागणार

ट्रॅव्हल्स असोसिएशनने अधिकृत भाडेवाढ जाहीर केलेली नाही. मात्र, ऑनलाईन बुकिंग प्रणालीत दिवाळीच्या काळातील तिकट दरात तिप्पट वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.

Diwali Travel Shock
ग्राहकांसाठी खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामध्ये ९,३०० रूपयांची घट, पाहा लेटेस्ट दर

छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी ५५० रूपये मोजावे लागत होते. तर, दिवाळीत १५५० रूपयांपर्यंत मोजावे लागतील. तर, पुण्यात सध्या ५८१ मोजावे लागतील. तर, दिवाळीत १५१० मोजावे लागतील. मुंबईत सध्या ८०० आकारले जात आहे. दिवाळीत तिप्पट म्हणजेच २५०० रूपये आकारले जातील. नागपूरसाठी सध्या १२३० आकारले जात आहे. तर, दिवाळीत ४००० रूपये तिकीट दर आकारले जाऊ शकतील.

नियम काय सांगतात

नियमानुसार, खासगी ट्रॅव्हल्सचालकांना एसटीच्या तुलनेत दीडपट भाडे आकारण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त आकारल्यास प्रवासी तक्रार करू शकतात. तक्रारी आल्यास आरटीओकडून कारवाई केली जाते. मात्र, ट्रॅव्हल्स चालकांचा दावा आहे की अनेक मार्गांवर त्यांचे द दर हे एसटीपेक्षा कमी असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com