ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांविषयी नेमकं हायकोर्टाच्या आदेशात काय म्हटलं?

साधारण ५ महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर आज सुटला
MSRTC Strike
MSRTC StrikeSaamTV
Published On

मुंबई: साधारण ५ महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर आज सुटला आहे. एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर (employees) कारवाई नको, असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

हायकोर्टाच्या (High Court) आदेशानंतर एसटी राज्यात परत एकदा धावणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका. सर्वांना परत सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र, आता थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचे साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी सूचना मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे. यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू, असे आश्वासन महामंडळाने दिल्यामुळे आज गुरूवारी सकाळी 10 वाजता यावर परत सुनावणी करण्यात आली.

हे देखील पहा-

नेमकं हायकोर्टाच्या आदेशात काय म्हटलं?

कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई नको. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत रुजू व्हावे. एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी मिळावी. बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये कोव्हिड भत्ता द्यावा. प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. कर्मचारीही सारासार विवेकबुद्धीला पटणार नाही, असं वागले. पण या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी द्यायला हवी. त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका. यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. यासाठी त्यांनी मागील ६ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी हे कामबंद आंदोलन पुकारले होते.

MSRTC Strike
Breaking: बनायला गेला 'प्ले बाॅय' आणि घालवले वडिलांचे १७ लाख

आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश हायकोर्टाने दिल्यानंतर, मुंबईतील आझाद मैदान परिसरात हजारोंच्या संख्येने जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. आज आमचा विजय झाला. आमच्या दुखवट्याची पुढील भूमिका गुणरत्न सदावर्ते ठरवतील, अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com