भाजप आमदाराच्या गाडीवर माजी सैनिकांनी फेकली काळी शाई

माजी सैनिकांने काळी शाई फेकून वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या
भाजप आमदाराच्या गाडीवर माजी सैनिकांनी फेकली काळी शाई
भाजप आमदाराच्या गाडीवर माजी सैनिकांनी फेकली काळी शाईSaam Tv
Published On

पंढरपूर - विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर माढा तालुक्यातील रिधोरे गावातील एका माजी सैनिकांने काळी शाई फेकून वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. दोन वर्षांपूर्वी आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांची माफी देखील मागितली होती.

हे देखील पहा -

आमदार प्रशांत परिचारक आज सकाळी बार्शी येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना माढा तालुक्यातील रिधोरे गावातील बापू गायकवाड या माजी सैनिकांनी त्यांची गाडी अडवून गाडीवर काळी शाई टाकली. या वेळी त्यांनी वंदे मातरम् अशा घोषणा ही दिल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com