Paduka Darshan Sohala : ज्ञानोबा माउली.. श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भक्तांची मांदियाळी

Paduka Darshan Sohala : 'ज्ञानोबा माउली, तुकाराम' गजरात वरळीतील 'एनएससीआय डोम'मधील वातावरण भक्तिमय झाले आहे. शनिवारी, २१ संत आणि श्रीगुरूंच्या पादुका दाखल झाल्या. रिंगण सोहळा, भजनामध्ये भाविक तल्लीन झाले आहेत.
Paduka Darshan Sohala
Paduka Darshan SohalaSaam tv
Published On

Paduka Darshan Sohala : 'ज्ञानोबा माउली, तुकाराम' गजरात वरळीतील 'एनएससीआय डोम'मधील वातावरण भक्तिमय झाले आहे. शनिवारी, २१ संत आणि श्रीगुरूंच्या पादुका दाखल झाल्या. रिंगण सोहळा, भजनामध्ये भाविक तल्लीन झाले आहेत. पाउली व फुगड्या खेळत भाविकांनीही ठेका धरला आहेत. शनिवार अन् रविवार असे दोन दिवस भाविकांनी संत व श्रीगुरूंच्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला. सर्व भाविकांना लाडवाचा प्रसाद देण्यात येतोय. पादुका दर्शनासाठी आलेले भाविक एकमेकांना 'माउली' म्हणूनच संबोधत आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या दालनांना भेटी देऊन अनेकांनी आयुर्वेदिक औषधी, वनस्पतींची माहिती घेतली.

'सकाळ माध्यम समूहा'तर्फे वरळी येथील 'एनएससीआय डोम'मध्ये आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याला राज्यभरातील शेकडो भक्तांनी हजेरी लावली. वेगवेगळी भजनी मंडळे व गायकांनी संतांचे अभंग गायले. पखवाज व टाळांच्या ठेक्यात हरिनामस्मरणामुळे येथील वातावरण भक्तिमय झाले. रविवारी सकाळपासूनच पादुका दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. 'ॐ' नामाचा अखंड जप प्रत्येकजण करत होता. 'ॐ' कार स्वर ऐकत आणि पादुका मंदिरासमोरील घंटानाद करत भाविक दर्शन घेत आहेत. प्रत्येक संताचा नामजपही ते करत आहेत.

संत व सद्‌गुरू विचारांची पुस्तकेही भाविकांनी खरेदी केली आहे. शुक्रवारी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून संत आणि श्रीगुरूंच्या पादुका दाखल झाल्या होत्या. वरळीतील 'एनएससीआय डोम'मधील वातावरण शुक्रवारी दुपारपासूनच भक्तिमय झाले होते. संत ज्ञानेश्वर माउली (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत सावता माळी महाराज (अरण), संत एकनाथ महाराज (पैठण), संत तुकाराम महाराज (भंडारा डोंगर), संत निळोबाराय (पिंपळनेर) यांच्यासह श्री महेश्वरनाथ बाबाजी, श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज (शेगाव), समर्थ रामदास स्वामी (सज्जनगड), टेंब्ये स्वामी महाराज (माणगाव), श्री गोंदवलेकर महाराज (गोंदवले), शंकर महाराज (धनकवडी-पुणे), गुळवणी महाराज (पुणे), गजानन महाराज (शिवपुरी) आणि श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे (कार्ला) या श्रीगुरूंच्या पादुकांसमोर भाविक मनोभावाने नतमस्तक होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com