नवी मुंबई : विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार होत असून नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे लावले जात आहे. या विरोधात आमदार गणेश नाईक यांनी राज्याच्या निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, नवी मुंबईतील शहरी भाग, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात सध्या बीएलओ स्तरावरील निवडणुक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
हे देखील पहा :
यामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षाचे लोक सक्रीय आहेत. मतदार याद्यांमधील अनेक बोगस नावे वगळण्यासाठी आणि मयत व्यक्तींची नावे काढून टाकण्यासाठी नागरिकांनी कागदपत्रे सादर करूनही हेतूपुरस्सर ही नावे रद्द करण्यात आलेली नाहीत, असे दिसून येते. मतदार याद्यांमध्ये ज्या व्यक्तींची नावे आहेत, मात्र छायाचित्रे नाहीत अशा व्यक्तींची छायाचित्रे स्विकारताना तीच खरी व्यक्ती आहे काय? याची खातरजमा देखील केली जात नाही.
त्यामुळे अनेक याद्यांमध्ये नाव एका व्यक्तीचे आणि फोटो दुसऱ्या व्यक्तीचा अशा नोंदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे लोक दबाव टाकून हे गैरप्रकार करीत असून निष्पक्ष निवडणुक प्रक्रीयेची त्यांनी थट्टा चालवली आहे. काही मतदार याद्यांमधील छायाचित्रे नसलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, काही मतदार याद्यांमध्ये ती हेतुपूर्वक कायम ठेवण्यात आली आहेत. ही नावे वगळण्यासाठी निवदने देऊनही ती नावे अद्याप वगळण्यात आलेली नाही. याकडे आमदार नाईक यांनी निवडणुक आयोगाचे लक्ष्य वेधले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.