नंदुरबार - निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोट निवडणुकीमध्ये नंदुरबार Nandurbarजिल्हा परिषदेच्या ११ गट व पंचायत समितीचे १४ गणांसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस - महा विकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांद्वारे युती करून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर भाजप स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय चौधरी Vijay Chaudhari यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या OBC Reservation मुद्द्यावरून पद रद्द झाल्याचा सर्वात जास्त फटका भाजपला BJP ७ जागांवर बसला होता.
हे देखील पहा -
जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि शिवसेनेची असलेली सत्ता कायम राहावी यासाठी युतीसाठी प्रयत्न केले जात आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असून त्याआधी महा विकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये युतीसाठी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये युती न झाल्यास सर्व पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी आपापले उमेदवार निश्चित केले आहे.
प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी यांची कोपर्ली गटातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. तर भाजप आमदार विजयकुमार गावित यांची लहान कन्या सुप्रिया गावित यांची कोळदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सोबतची लढत प्रतिष्ठेची होणार असून आमदार विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सुप्रिया गावित यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.