Eknath Shinde : मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ३ मोहरे नाराज, एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेणार, थेट इशाराच दिला

Shiv Sena Eknath Shinde : मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदार नाराज आहेत. त्याना एकनाथ शिंदेंनी सबुरीचा सल्ला दिला आहे. नाराजी कायम राहिली तर मंत्रिपदाचा विचार केला जाणार नाही, असा एकप्रकारे इशाराच त्यांनी आपल्या नेत्यांना दिलाय.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam tv
Published On

Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. नागपूरमध्ये येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात २१ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर अनेक अनुभवी मंत्र्यांचा पत्ता कट्ट झाला. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी तर अधिवेशनात न थांबण्याऐवजी मतदारसंघात माघारी परतण्याचा निर्णय झाला. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेण्याचा विचार केलाय. नाराज असणाऱ्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही, असा थेट इशाराच दिलाय.

फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची माळ गळ्यात न पडल्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांकडून आदळआपट करण्यात आली. तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी अधिवेशनात न राहता आपल्या मतदारसंघात परतण्याचा निर्णय घेतला. अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर नाराज नसल्याचे सांगितले खरे पण तेही नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. दीपक सावंत यांच्या नाराजीचीही राजकीय चर्चा आहे. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली.

Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion LIVE : देवेंद्र फडणवीस सरकारमधील शिलेदारांची यादी एका क्लिकवर, वाचा

काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

श्रध्दा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल . योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तानाजी सावंत नाराज?

आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असल्याचे समोर आलेय. तानाजी सावंत नागपूर येथील अधिवेशन सोडून पुण्याला परतले आहेत. तानाजी सावंत बरोबर इतर आमदारही नाराज असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. पण यावेळी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.

Eknath Shinde
Cabinet Expansion : सावंत, सत्तार ते भुजबळ,वळसे पाटील अन् मुनगंटीवार-चव्हाण; ११ दिग्गजांना डच्चू,यादी एका क्लिकवर

अर्जुन खोतकर मतदारसंघात परतले, नाराजीची चर्चा -

मी नाराज वगैरे काही नाही, मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील. ही गोष्ट खरी आहे की शिवसेनेच्या वतीने धनुष्य बाणावर निवडणूक लढवणारा आठव्यांदा मी एकटाच आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कार्यकर्त्यांची भावना असते त्यांचे गेल्यावर त्यांच्याशी बोलू.

दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या राजकीय चर्चेनं जोर धरलाय. दोन्ही नेत्यांकडे शिंदेंच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदे होती. पण फडणवीस सरकारमध्ये या दोन अनुभवी चेहऱ्यांना नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत.

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळाले?

1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री

2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री

3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री

4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री

5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री

6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री

7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री

8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री

9. संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री

10. योगश कदम- राज्यमंत्री

11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com