एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत.
Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis And Eknath Shinde Saam Tv

मुंबई: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे यांना भाजपचे संपूर्ण समर्थन असेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. ते आज संध्याकाळी एकटेच शपथ घेणार आहेत.

Devendra Fadnavis And Eknath Shinde
स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला - एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी आज, गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देणार असून, ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis And Eknath Shinde
CM Eknath Shinde: रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंचा 'असा' आहे संघर्षमय प्रवास

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी काम करत नाही. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा भाजपने निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, आम्ही जो निर्णय घेतला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका घेवून पुढे जात आहे. बाळासाहेबांचा विचार तसेच राज्याचा विकास हा अजेंडा घेवून आम्ही निघालो आहोत. गेले काही दिवस आम्ही सर्व ५० आमदार एकत्र आहोत. राज्याच्या विकास आणि गेल्या अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्याला माहित आहे. फडणवीसांनीही याबाबत नुकतंच सांगितलं आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis: मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार

मतदारसंघातील अडचणी विकासकामांबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार माहिती दिली आणि मागणी केली. मी देखील अनेकदा त्यांच्याकडे चर्चा केली. मात्र, अनैसर्गिक आघाडीबाबत आम्हा सर्व आमदारांमध्ये नाराजी होती. तसेच पुढच्या निवडणुकित येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हिताच्या भविष्याच्या दृष्टीने सर्व काही घडत आहे. काल मंत्रीमंडळात काही निर्णय घेण्यात आले त्याचे आम्ही स्वागत करतो, पण हे निर्णय आपण पूर्वीच घ्यायला हवे होते. ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात त्याचं कारण, आत्मपरिक्षण करायची गरज होती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार एकत्र येतात आणि त्यांनी मला समस्या सांगितल्या.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com