Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांची घोषणा, सर्वसामान्य जनता मात्र अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत

MJPJAY Scheme : या योजनेला १ महिना पूर्ण होत असून अद्याप शासकीय निर्णय जारी न झाल्यामुळे नागरिकांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Saam tv
Published On

संजय गडदे

Update on Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana :

सरकारने मागच्या काही काळापासून सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या योजना आणल्या आहेत. त्यातील एक महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना. या योजने अंतर्गत यापूर्वी १.५ लाखांचा आरोग्या विमेचा लाभ घेता येत होता.

मागच्या महिन्यात पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा विमा १.५ लाखावरुन ५ लाखांपर्यत वाढवण्याची घोषणा केली. ही घोषणा २८ जून २०२३ रोजी करण्यात आली होती.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Indian Railway : फक्त 35 पैसे जास्तीचे खर्च करा, होईल10 लाखांचा फायदा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

उद्या या योजनेला (Scheme) १ महिना पूर्ण होत असून अद्याप शासकीय निर्णय जारी न झाल्यामुळे नागरिकांना कोणताही लाभ (Benefits) मिळू शकलेला नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे की यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित आहे आणि घोषणा झाल्यामुळे नागरिक आणि शासकीय अधिकारी यांच्यात खटके उडत आहेत. शासकीय (Government) निर्णय अजून झाला नसला तरी त्याच्या शासकीय जाहीराती सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना ही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आली. याचीही फक्त घोषणा करण्यात आली आहे पण प्रत्यक्षात कोणताही शासकीय निर्णय जारी करण्यात आला नाही. याबाबत रुग्ण मित्र राजेंद्र ढगे यांसकडे तक्रारी प्राप्त होत आहे.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Income Tax Return : टॅक्स भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! ITR-1 चा फॉर्म भरण्याचा अधिकार कुणाला? जाणून घ्या सविस्तर

अनिल गलगली यांनी म्हटले आहे की, ज्यावेळी या घोषणा जाहीर केल्या जातात त्याच वेळी शासकीय निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणायला हवेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com