Nashik : स्कूल बसमधून उतरली आणि टायर खाली सापडली, नाशकात चिमुकलीचा मृत्यू; कुुटुंबाने फाेडला हंबरडा

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.
Nashik, School Bus, Student, Girl
Nashik, School Bus, Student, Girlsaam tv

- तबरेज शेख

Nashik Accident News : नाशिक (Nashik) शहरात एका शाळेच्या बसच्या (school bus) धडकेत आठ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबास माेठा धक्का बसला आहे. नाशिकरोड पोलिस घटनेचा (Nashik road police station) तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Nashik, School Bus, Student, Girl
MPSC Result : डीवायएसपी बनण्याचे स्वप्न साकार, 'एमपीएससी' त टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा सलग दुस-यांदा राज्यात प्रथम

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपेक्षा नवज्योत भालेराव (apeksha bhalerao) (राहणार पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड) हिला स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरून व्हॅनच्या पाठीमागून घरी निघाली हाेती.

Nashik, School Bus, Student, Girl
Amalaki Ekadashi 2023 : सापडणार का पंढरीचा चाेर ? सजावटीची एक टन द्राक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून गायब (पाहा व्हिडीओ)

त्यावेळी व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेतली. त्यामुळे मागच्या टायरात सापडून अपेक्षा गंभीर जखमी झाली. औषध उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नाेंद नाशिकरोड पोलीसांनी घेतली असून गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com