Oil Prices Increase : खिशाला चाप बसणार! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागलं, किमतीत २० रुपयांची वाढ

Edible Oil Prices May Rise By 20 rs per litre : केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केलीय. त्यामुळे खाद्यतेल महागणार असल्याचं समोर आलंय.
खाद्यतेल महागलं
Oil Prices IncreaseSaam Tv
Published On

मुंबई : ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेल महागणार असल्याचं समोर आलंय. त्यामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. कारण केंद्र सरकारने सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कामध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. याचा परिणाम बाजारावर दिसून आलाय. खाद्यतेलाच्या १५ लिटर डब्याच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. यामुळे ऐन सणासुदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना खाद्यतेलाच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या आयातशुल्कात वाढ करण्याच्या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या (Edible Oil Prices) आहेत. याअगोदर कच्चे सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेल यांच्या आयातीवर ५.५ टक्के, तर रिफाइंड तेलावर १३.७५ टक्के इतके आयात शुल्क होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामधून स्वस्त खाद्यतेलाची आवक होऊन देशात देखील भाव कमी झालेले होते. याचा फटका याबीनसह तेलबिया पिकांच्या भावावर देखील झाला होता.

गृहीणींचे बजेट कोलमडणार ?

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता एक किलो खाद्यतेल जवळपास १८ ते २० रूपयांनी महाग (Oil Prices Increase) झालंय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांचा प्रचंड गोंधळ झाल्याचं समजतंय. तेलावरील शुल्कामध्ये २० टक्के वाढ केल्यामुळे १५ लिटरच्या डब्यामागे प्रत्येकी २५० रुपयांची वाढ झालीय. सध्या गणेशोत्सव सुरू (Customs Duty on Crude Oil) आहे. पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळी सण आहेत. या काळात खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. अशातच भाववाढ झाल्याने मात्र आता गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याचं दिसतंय.

खाद्यतेल महागलं
Edible Oil Price: चमचमीत खणाऱ्यांच्या जिभेला लागणार लगाम? खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ

आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी

यामुळे शेतकरी, प्रक्रियादार, रिफायनरीज् यांच्याकडून आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जात होती. आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीनच्या दरात वाढ झालीय. मात्र, सर्वांना आता खाद्यतेलाच्या भाववाढीचा (sunflower And Soyabean Oil) फटका सोसावा लागणार आहे. केंद्र सरकारने आता लावलेला हा कर आतापर्यंतचा सर्वाधिक कर असल्याचं बोललं जातंय. याचा सर्वात जास्त परिणाम पामतेल आणि सूर्यफुल तेलाच्या किमतीवर होताना दिसत आहे.

खाद्यतेल महागलं
Refined oil prices : रिफाईन्ड तेलाच्या किंमती पुन्हा वाढणार, मलेशियावर भारताची मदार, पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com