विधान परिषद निवडणूक: विजयानं बावनकुळे भावूक, फडणवीसांना तब्बल १३ सेकंद मारली मिठी

चंद्रशेखर बावनकुळेंना एकुण ३६२ मतं मिळाली तर मंगेश देशमुखांना केवळ १८६ मंत मिळाली. या विजयानंतर नागपुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
विधान परिषद निवडणुक: विजयानं बावनकुळे भावूक, फडणवीसांना तब्बल १३ सेकंद मारली मिठी
विधान परिषद निवडणुक: विजयानं बावनकुळे भावूक, फडणवीसांना तब्बल १३ सेकंद मारली मिठीSaam Tv
Published On

नागपुर: विधान परिषद निवडणुकीच्या नागपुरच्या जागेवर भाजपने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा दणक्यात पराभव केला. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे तब्बल १७६ मतांनी विजयी झाले आहेत. कॉंग्रेस समर्थित अपक्ष उमेद्वार मंगेश देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळेंना एकुण ३६२ मतं मिळाली तर मंगेश देशमुखांना केवळ १८६ मंत मिळाली. या विजयानंतर नागपुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दरम्यान फडणवीसांना (Devendra Fadanvis) विजयी झालेल्या बावनकुळे यांनी तब्बल १३ सेकंद मिठी मारली. (Maharashtra Legislative Council Election: Due to the victory, Bawankule became passionate and hugged Fadnavis for 13 seconds)

हे देखील पहा -

यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. जेव्हा मी स्वतः निवडून आलो त्यापेक्षाही जास्त आनंद मला झाला आहे. या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चकमा दिलायं. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवलेला आहे. एकुणच या निवडणुकात ६ पैकी ४ जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले की विजय निश्चित होतो हे समीकरण चुकीचं ठरवलं आहे, हे स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातली जनता ही भाजपसोबत आहे हे देखील स्पष्ट होतं, आणि भविष्यातदेखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय आमच्या भविष्यातील विजयाची नांदी आहे असं फडणवीस म्हणाले.

विधान परिषद निवडणुक: विजयानं बावनकुळे भावूक, फडणवीसांना तब्बल १३ सेकंद मारली मिठी
'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला

मी आमचे राष्ट्रीय नेते मोदीजी, नड्डाजी, अमितभाई यांचे आभार मानतो की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या सर्वांना उमेद्वारी दिली. नितीम गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणुक लढलो त्यांचेही मी आभार मानतो. महाविकास आघाडीची मतं ही नागपुरमध्ये (Nagpur) आणि अकोल्यात (Akola) फुटली, आम्हाला मतं देणाऱ्यांचे मी आभार मानतो असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com